केंद्र सरकारने अनुसूचित जातीतील बांधवांना अनेक सोयीसुविधांपासून वंचित ठेवले कॉंग्रेस प्रदेश समन्वयक सुनीलभाऊ सावर्डेकर यांचा आरोप

केंद्रातील भाजप सरकारने अनुसूचित जातींसाठी असलेल्या अनेक सोयीसुविधा रद्द केल्या आहेत.शिष्यवृत्ती रद्द करून गोरगरीब विद्यार्थांची शैक्षणिक प्रगती रोखण्याचे काम सरकार करत आहे.नोकरभरतीत अनुसूचित जातींच्या समाजावर अन्याय होत असल्याचा आरोप कॉंग्रेसचे अनुसूचित जाती प्रदेश समन्वयक सुनीलभाऊ सावर्डेकर यांनी केला.ते आज कॉंग्रेस भवन येथील अनुसूचित जाती मेळाव्यात बोलत होते.

रत्नागिरी दि.२२ प्रतिनिधी

पुढे प्रदेश समन्वयक सुनीलभाऊ सावर्डेकर म्हणाले की,निवडणूका आल्या की हिंदू-मुस्लीम वरून भाजप राजकारण करते.निवडणूका संपल्या की,हिंदू मधील जाती-जातीत राजकारण केले जाते.हिंदूतील चार वर्णांमध्ये राजकारण केले जाते.या राजकारणाला आपल्याला बळी पडायचे नाही.आपल्याला अन्यायाविरोधात आवाज़ उठवायचा आहे.आपल्यावर होणाऱ्या अन्यायाची जाणीव व्हावी त्याबाबत समाजात जागृकता निर्माण व्हावी याकरिता आज अनुसूचित जातीचा मेळावा आयोजित केला आहे.गेल्या ४० वर्षात कॉंग्रेसच्या इतिहासात अनुसूचित जातींचा मेळावा झालेगा नाही.हा मेळावा आपण आयोजित करून आपल्यामध्ये एकजूट निर्माण करत आहोत ती अन्याया विरोधात लढण्यासाठी.केंद्र सरकारने आपल्या विद्यार्थी वर्गाला अनेक सुविधा पासून वंचित ठेवले.शिष्यवृत्ती रद्द केली.आज नोकऱ्या नाहीत.बेरोजगारी वाढतेय.जिल्ह्याचा अनुसूचित जातीचा अनुशेष खर्च केला जात नाही.केंद्र सरकारच्या अनेक योजना आपल्या पर्यंत पोहचवल्या जात नसल्याबद्दल सुनिलभाऊ सावर्डेकर यांनी नाराजी व्यक्त केली.यावेळी माजी आमदार हुस्नबानू खलिफे,रमेश सावंत,रघुनाथ आडविलकर,राम कडवेकर सुरेश खेडेकर,स्मिता सावर्डेकर उपस्थित होते.