कळमसरा येथे रक्तदान शिबीर घेऊन राष्ट्रसंत गाडगे महाराज यांना माणुसकी समुहातर्फे अभिवादन

कळमसरा तालुका पाचोरा येथे सु-लक्ष्मी बहुउद्देशिय सेवाभावी संस्था व माणुसकी ग्रुप कळमसरा यांच्या वतीने रक्तदान शिबिर घेऊन गाडगेबाबाना विनम्र अभिवादन करण्यात आले.यावेळी 
कळमसरा गावातील प्रथम नागरिक सरपंच अशोक दादा चौधरी, सुट्टी वर आलेले जवान प्रसाद पवार, चंद्रकांत गीते, नितीन क्षीरसागर यांनी प्रतिमेचे पूजन केले. कवी मंगलदास मोरे यांनी स्वलिखित आरती गायन केली व रक्तदान शिबिराला सुरुवात केली.
संत गाडगेबाबा यांचे विचार घेऊन काम करणारे समाजसेवक गजानन क्षीरसागर यांनी गाडगेबाबांनी केलेले रुग्णसेवेचे कार्य, निराधारांना आधार देणे, अंधश्रद्धा रूढी परंपरा,यावर माहिती विशद केली 
कार्यक्रम यशस्वीतेसाठी माणुसकी ग्रुप व ग्रामस्थ कळमसरा, रक्त संकलनासाठी रेड प्लस ब्लड बँक जळगाव यांनी सहकार्य केले