रबाळे येथील अनधिकृत बांधकामावर नमुंमपा आणि सिडको यांची संयुक्त कारवाई

रबाळे येथील अनधिकृत बांधकामावर नमुंमपा आणि सिडको यांची संयुक्त कारवाई

Navi Mumbai : रबाळे येथील अनधिकृत बांधकामावर नमुंमपा आणि सिडको यांची संयुक्त कारवाई 

नवी मुंबई महानगरपालिका विभाग कार्यालय ‌घणसोली कार्यक्षेत्रातील निलम रामकृष्ण पाटील, घर क्र. 545, रबाळे, अयप्पा मंदिराजवळ, घणसोली. यांचे अनधिकृत बांधकाम प्रगतीपथावर होते, नवी मुंबई महानगरपालिकेची कोणतीही पुर्वपरवानगी न घेता अनधिकृतपणे काम सुरू केले होते. संबंधितांनी केलेले अनधिकृत बांधकाम स्वत:हून हटविणे आवश्यक होते. परंतू त्यांनी सदर ठिकाणी अनधिकृत बांधकाम सुरू ठेवले होते. सदर अनधिकृत बांधकामावर नवी मुंबई महानगरपालिका व मे. सिडको यांच्या संयुक्त तोडक मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले होते. त्यानुसार सदरील अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले. या धडक मोहिमेसाठी 1 पोकलेन, 10 कामगार व घणसोली विभागातील अधिकारी / कर्मचारी, पोलीस पथक तैनात होते. यापूढे देखील अशा प्रकारे कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.