NAVI MUMBAI BIG BREAKING : मनसेचा पाणी प्रश्नासाठी नवी मुंबई महानगरपालिकेवर हंडा मोर्चा - THE PUBLIC NEWS 24

१५ दिवसांपूर्वी मनसेने महानगरपालिकेला निवेदन देत पाणी प्रश्न सोडवण्याची मागणी केली होती, ज्यावर सात दिवसांत तोडगा निघेल असे आश्वासन दिले गेले. परंतु, परिस्थितीत काहीही बदल झाला नसल्याने नागरिकांचा संताप वाढला आणि अखेर मनसेने हंडा मोर्चाचे आयोजन केले.

NAVI MUMBAI BIG BREAKING : मनसेचा पाणी प्रश्नासाठी नवी मुंबई महानगरपालिकेवर हंडा मोर्चा  - THE PUBLIC NEWS 24

THE PUBLIC NEWS 24 -विशेष प्रतिनिधी ALOK SHUKLA 

नवी मुंबईच्या सीबीडी, पारसिक हिल येथील राहुल नगर वसाहतीतील नागरिकांना गेल्या दोन वर्षांपासून पाण्याच्या तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. या गंभीर प्रश्नाच्या निराकरणासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आज नवी मुंबई महानगरपालिकेवर हंडा मोर्चा काढला.

१५ दिवसांपूर्वी मनसेने महानगरपालिकेला निवेदन देत पाणी प्रश्न सोडवण्याची मागणी केली होती, ज्यावर सात दिवसांत तोडगा निघेल असे आश्वासन दिले गेले. परंतु, परिस्थितीत काहीही बदल झाला नसल्याने नागरिकांचा संताप वाढला आणि अखेर मनसेने हंडा मोर्चाचे आयोजन केले.

मोर्चाच्या वेळी पालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी आणि पोलिसांनी मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर मोर्चाला अडवले, परंतु मनसेच्या कार्यकर्त्यांनी जोरदारपणे आपला आवाज उठवला. मोठ्या संख्येने महिला आणि पुरुष हंडा घेऊन या मोर्चात सहभागी झाले होते.

मोर्चाची दाहकता पाहून अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे यांनी मोर्चाला सामोरे जाऊन चर्चा केली. त्यांनी मनसे शहर सचिव सचिन कदम यांच्यासह चर्चा करून, कार्यकारी अभियंता शंकर जाधव आणि उप अभियंता भानुशाली यांना प्रत्यक्ष पाहणी करण्याचे आणि २ इंचची नवीन पाईपलाईन टाकून कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे आदेश दिले.

या निर्णयानुसार, लवकरच २ इंचची नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू होणार आहे, ज्यामुळे राहुल नगरचा पाणी प्रश्न कायमचा सुटण्याची अपेक्षा आहे. परंतु, येत्या १० दिवसांत जर हा प्रश्न सुटला नाही, तर मनसे आयुक्तांच्या दालनात घुसून आंदोलन करेल असा इशारा मनसे शहर सचिव सचिन कदम यांनी दिला.

या मोर्चात विभाग अध्यक्ष भूषण कोळी, उपविभागअध्यक्ष विनोद लांडगे, उपविभागअध्यक्ष संतोष टेकवडे, महाराष्ट्र सैनिक, तसेच मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते.